असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास
प्रा. मधुकर केशव ढवळीकर यांच्या निधनाने भारतीय पुरातत्वशास्त्रातील एका युगाची अखेर झाली. उत्तम संशोधक, उत्तम शिक्षक, उत्तम लेखक, उत्तम वक्ता, उत्तम वाचक आणि स्पष्टवक्ता, व्यवहारी कुशल प्रशासक असे थोडक्यात त्यांचे वर्णन करता येईल. त्यांचे मित्र रा. चिं. ढेरे यांच्याच प्रमाणे दख्खनच्या इतिहासावर जे कुणी काम करेल, त्यांना ढवळीकरांच्या संशोधनाची दखल घेणे अनिवार्य असेल.......